सूरह 33 · जुझ 21

Al-Ahzab · 33:21

لَقَدْ كَانَ لَكُمْ فِي رَسُولِ اللَّهِ أُسْوَةٌ حَسَنَةٌ لِمَنْ كَانَ يَرْجُو اللَّهَ وَالْيَوْمَ الْآخِرَ وَذَكَرَ اللَّهَ كَثِيرًا

२१. निःसंशय, तुमच्यासाठी अल्लाहच्या पैगंबरामध्ये उत्तम नमुना आहे१ त्या प्रत्येक माणसाकरिता जो अल्लाहची आणि कयामतच्या दिवसाची आशा बाळगतो आणि अल्लाहचे अत्याधिक स्मरण करतो.
____________________
(१) अर्थात समस्त मुस्लिमांकरिता अल्लाहचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या ठायी उत्तम नमुना आहे. तेव्हा तुम्ही जिहादमध्ये आणि सहनशीलता व ईशभयात त्यांचे अनुसरण करा. आमचे पैगंबर जिहादप्रसंगी उपाशी राहिले. येथपावेतो की पोटावर दगड बांधावे लागले, त्यांचे तोंड जखमी झाले, त्यांचा दात तुटला. खंदक आपल्या हातांनी खणला व एक महिनापावेतो शत्रूच्या समोर अटळ राहिले. ही आयत अहजाब युद्धासंदर्भात अवतरली असली, तरी ज्या युद्धप्रसंगी प्रामुख्याने पैगंबरांचे चरित्र समोर ठेवण्याचा व त्यांचे अनुसरण करण्याचा आदेश दिला गेला आहे, तरीदेखील हा आदेश सर्वसामान्य आहे. अर्थात पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची सर्व कथने, कर्मे प्रत्येक स्थितीत सर्व मुसलमानांकरिता अनुसरणीय आहेत, अनिवार्य आहेत. मग त्यांचा संबंध उपासनेशी असो किंवा सामाजिक, अर्थव्यवस्था किंवा राजकारणाशी असो. तात्पर्य जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक वळणावर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करणे अनिवार्य कर्तव्य आहे.

तफसीर

तुमच्या भाषेत तफसीर नाही. हे इंग्रजीतील अल-मुख्तसर आहे.

21. There has been for you an excellent example in what Allah’s Messenger said, carried out and practiced, for he presented his own noble self and personally engaged in battle, so how after that can you be miserly with your souls over his soul? And only he who is hopeful of the Last Day, works for it and remembers Allah abundantly will follow Allah’s Messenger (peace be upon him). As for the one who is not hopeful of the Last Day and does not remember Allah abundantly, he does not follow His Messenger (peace be upon him).

वाचकात उघडा - संपूर्ण सूरह वाचा

तुमच्या भाषेतील तफसीर

अरबी तफसीरे

भाषांतर

ऐका