सूरह 28 · जुझ 20
Al-Qasas · 28:65
وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ مَاذَا أَجَبْتُمُ الْمُرْسَلِينَ
६५. आणि त्या दिवशी त्यांना बोलावून विचारेल की तुम्ही पैगंबरांना काय उत्तर दिले होते?१
____________________
(१) या आधीच्या आयतीमध्ये ‘तौहीद’संबंधीचा प्रश्न होता. हे दुसरे ऐलान प्रेषित्वासंबंधी आहे. अर्थात तुमच्याकडे आम्ही रसूल पाठविले होते, तुम्ही त्यांच्याशी कसा व्यवहार केला, त्यांचे आवाहन स्वीकारले होते? ज्या प्रकारे कबरीत विचारले जाते की तुझा पैगंबर कोण? तुझा दीन (धर्म) कोणता? ईमानधारक तर उचित उत्तर देतात, परंतु काफिर म्हणतो, अरेरे! मला काहीच माहीत नाही. त्याच प्रकारे कयामतच्या दिवशीही त्यांना या प्रश्नाचे उत्त ध्यानी येईल. यास्तव पुढे फर्माविले, त्यांच्यावर सर्व समाचार आंधळे होतील, म्हणजे कोणताही पुरावा त्यांच्या ध्यानी येणार नाही, ज्यास ते सादर करू शकतील, इथे प्रमाणांना, समाचारांच्या अर्थाने घेऊन याकडे संकेत केला गेला आहे की त्यांच्या खोट्या ईमानासाठी वस्तूतः त्यांच्याजवळ कसलेही प्रमाण नाही, आहेत फक्त कथा कहाण्या. ज्या प्रकारे आज देखील कबरीची पूजा करणाऱ्यांजवळ मनाने रचलेल्या चमत्कारांच्या किश्श्यांखेरीज अन्य काही नाही.

तफसीर
तुमच्या भाषेत तफसीर नाही. हे इंग्रजीतील अल-मुख्तसर आहे.
65. On the day their Lord will call them saying: “What answer did you give My Messengers I sent to you?”
वाचकात उघडा - संपूर्ण सूरह वाचा